पॅरीस : स्पेनच्या कार्लोस अल्कराज ने पुन्हा फ्रेंच ओपन पुरुष एकेरीच्या अंतिम फेरीत इटलीच्या जॅनिक सिन्नरला पराभूत करून विजेतेपद पटकावले. फ्रेंच ओपनमध्ये रविवारी अंतिम लढतीचा सामना झाला. स्पेनचा अल्कराज आणि इटलीच्या सिनरमध्ये मोठी चुरस पाहण्यास मिळाली. कोण विजेतेपद जिंकणार याकडे चाहत्यांचे लक्ष लागले होते. पाचव्या सेटच्या अंतिम सामन्याच्या टायब्रेकरमध्ये, अल्काराझने आपले वर्चस्व दाखवले आणि (१०-२) ७-६ अशी स्कोअरलाइन नोंदवली. भारतीय वेळेनुसार मध्यरात्री अंतिम लढत पार पडली. गतविजेत्या कार्लोस अल्कराजसमोर यंदा सिनरचे तगडे आव्हान होते. गेल्या वर्षी अमेरिकन ओपन आणि यंदा ऑस्ट्रेलियन ओपन विजेतेपद पटकावल्यानंतर सिनरने सलग तिसर्यांदा ग्रँड स्लॅम स्पर्धेची अंतिम फेरी गाठलीे. या स्पर्धेच्या उपांत्य सामन्यात त्याने २४ ग्रँड स्लॅम विजेत्या जोकोविचचे आव्हान संपुष्टात आणले त्यामुळे सिनरला ग्रँड स्लॅम विजेतेपदाची हॅटट्रिक करण्याची संधी होती. तर अल्कराज सलग दुसर्यांदा ही स्पर्धा जिंकून राफेल नदालनंतर क्ले कोर्टवर आपले वर्चस्व सिद्ध केले
Fans
Followers